Posts

Showing posts from December, 2023

हिवाळ्यामध्ये अवश्य सेवन करा या ३ भाज्या

  हिवाळ्याच्या या हंगामामध्ये काही हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात करून घेतल्यास, तुमची प्रतिकारशक्ती नक्कीच वाढते.   १.मेथीची भाजी       हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खाणे हे आरोग्यदायी ठरते. यामध्ये फायबरचे अधिक प्रमाण असून भूक कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच मेथी भाजी खाण्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते आणि शरीरामध्ये चांगली उर्जा राखण्यास आणि उष्णता राखण्यासदेखील मदत मिळते. आपल्या शरीराला फिट आणि एनर्जेटिक ठेवण्यासही मेथी मदत करते. २.गवारीच्या शेंगा         क्लस्टर बीन्स अर्थात गवारीची भाजी आरोग्यासाठी उत्तम ठरते. थंडीच्या दिवसात खाण्याने तुमच्या शरीरामध्ये फायबर आणि पोटॅशियमची कमतरता होत नाही. तसंच यामध्ये कॅलरी फारच कमी प्रमाणात असते आणि यातून मिळणारे प्रोटीन अधिक प्रमाणात असते. हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठीही या भाजीचा उपयोग करून घेऊ शकता. गवारीच्या भाजीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तप्रवाह आणि ब्लड प्रेशरचा स्तर नियंत्रित करण्यास मदत मिळते, ज्यामुळे हृदय चांगले राहते. ३.हिरवीगार कोथिंबीर चटणी, भाजी आणि अनेक पदार्थांमध्य...